विराटच्या मनगटातील अलर्ट सिग्नल देणारा व्हूप बँड

फोटो साभार अमर उजाला

करोना काळात आयपीएल स्पर्धेत खेळताना आरसी बंगलोर टीमचा कप्तान विराट कोहली मनगटात काळे घड्याळ सदृश काहीतरी घालून खेळताना दिसतो आहे. हे घड्याळ म्हणजे एक प्रकारचे यंत्र असून विराट आजारी पडण्यापूर्वीच किंवा त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसण्यापूर्वीच त्याला अलर्ट करणारा व्हूप बँड आहे.

या बँडमुळे हृदयाच्या ठोक्यांची गती, त्यातील अनियमितता, श्वास गती, शांत झोप या संदर्भातील माहिती मिळते. विराट बरोबर त्याच्या टीम मधील डिव्हीलीअर्स, उमेश यादव, मॉरिस यांनीही हा बँड वापरायला सुरवात केली आहे.

या बँड वापराची सुरवात प्रथम याच वर्षी अमेरिकन प्रोफेशनल गोल्फ स्पर्धेत गोल्फर निक वाताने याने केली. त्याने हा बँड घालता होता आणि झोपेत त्याच्या श्वासाची लय बदलल्याची सूचना या बँडवर दिल्यावर त्याने करोना टेस्ट करून घेतली. त्यात तो पोझिटिव्ह आला. त्यामुळे नंतर त्याला विलगीकरणात राहावे लागले. त्याच्या या अनुभवावरून अन्य गोल्फरनी हा बँड वापरायला सुरवात केली आहे आणि आता क्रिकेटपटूही तो वापरत असल्याचे दिसत आहे.