माजी मुख्यमंत्र्यांचे ‘त्या’ वक्तव्यावरुन घुमजाव


नांदेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता ठाकरे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याच्या वक्तव्यवरुन घुमजाव केले असून आपण तसे म्हटलेच नाही, त्याचबरोबर तिथेही निधी उपलब्ध झाला, अशी अपेक्षा असल्याचे मी म्हटले होते.

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण तसे म्हटलेच नसल्याचे सांगत अशोक चव्हाणांनी एकप्रकारे हा वाद टाळण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आज नांदेडमध्ये याबाबत ते बोलत होते. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांचे भाषण मी ऐकले नाही. पण मधल्या काळात काही निधी कमी मिळाला होता, तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेऊन प्रश्न मिटवला होता. समान निधी सर्वांना मिळाला आहे. आता सरकारमध्ये कुरबूर नाही. ज्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे सांगत, त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. पण आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असल्याचे वक्तव्य केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी परभणीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले होते.