Video Viral: जेठालालला भेटली नवी दया


सब टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून मागील १२ वर्षांपासून ओळख असलेली तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर या मालिकेत काम करणारे सर्व कलाकार हे देखील कायम चर्चेत असतात. खासकरुन या मालिकेतील दयाबेन आणि जेठालाल यांच्यामधील संवाद प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे पाहायला मिळते. सोनी वाहिनीवरील इंडियाज बेस्ट डान्सर या शोमध्ये तारक मेहतामधील सर्व कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांनी शोमध्ये दया बनलेल्या स्पर्धकासोबत डान्स केला आहे.

View this post on Instagram

Daya bhabhi bann kar jab #RutujaTheBest ne lagayi ‘Ae Haalo’ ki pukaar, jhoom uthe Tappu ke papa aur #TaarakMehtaKaOoltahChashmah ka pura parivaar! Tune in to #IBDxTMKOC special, this Sat-Sun at 8 pm, on Sony TV. #IndiasBestDancer @rutuja.junnarkar @ashish_patil2501_official @terence_here @geeta_kapurofficial @malaikaaroraofficial @bharti.laughterqueen @haarshlimbachiyaa30 @maakasamdilipjoshi @mmoonstar @realmandarchandwadkar @amitbhattmkoc @lodha_shailesh @jsonalika @tan_mahashabde @shyampathakpopu @jennifer_mistry_bansiwal @sunayanaf @raj_anadkat @samayshah_5 @ballusuri @palaksidhwani @mayur_vakani @nirmalsoni1 @hasmukhi @priyaahujarajda @iamazharshaikh @kushahh_ @officialsharadsankla19 @tanmayvekaria @jatin.bajaj @officialasitkumarrmodi @tarrakmehtakaooltachashma @taarakmehtakaooltahchashmahnfp

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial) on


आगामी भागाचा प्रोमो सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जेठालाल या प्रोमोमध्ये शोमधील दयाबेन बनलेल्या रुतुजा जुन्नरकर या स्पर्धकासोबत डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान ‘टप्पू के पापा’ असे देखील रुतुजाने म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

‘इंडियाज बेस्ट डांसर’च्या आगामी भागामध्ये रुतुजा आणि दिलीप जोशी यांचा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान शोची परिक्षक मलायका अरोरासोबत ‘अनरकली डिस्को चली’ या गाण्यावर डॉक्टर हातीने देखील डान्स केला आहे. मलायका आणि डॉक्टर हाथीचा देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.