डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार


आपले डोळे हे किती महत्वाचे असतात हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु हे महत्व कळणे आवश्यक आहे. त्यासाठी दहा मिनिटे डोळे बंद करून चालून बघावे, मग डोळे म्हणजे काय हे आपल्या लक्षात येईल. आपण समोरच्या माणसाशी बोलतो तेव्हा आपल्या सार्‍या भावना डोळ्यातून व्यक्त होत असतात. डोळे म्हणजे शरीराचा प्रकाश आहे, स्वभावाचा आरसा आहे. परमेश्‍वराने आपल्याला दिलेली ही एक मोठे देणगी आहे. आपण मात्र तिच्याकडे फारसे लक्ष देत नाही. पण लक्षात ठेवा, आपले डोळे निरोगी असतील तर शरीर निरोगी असेल. मात्र डोळ्याचे तेज संपले की, शरीरातील प्रकाशही नाहीसा होतो.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहाराचा खूप उपयोग होतो. या आहारामध्ये सर्वाधिक महत्वाचे आहे गाजर. गाजरामध्ये अ जीवनसत्व विपुल असते. त्यातून डोळ्यांना बिटा कॅरोनिन हे द्रव्य मिळते. ते प्रभावी कर्करोग निरोधक असते, शिवाय गाजर भरपूर खाणार्‍याला मोतीबिंदूची भीती नसते. दृष्टी मंद होण्याची प्रक्रिया आपल्या शरीरात सतत सुरू असते, परंतु आहारात गाजराचा वापर वाढवला की ही प्रक्रिया थांबते.

डोळ्यांसाठी आवश्यक असलेला दुसरा आहार म्हणजे पालक. पालकामध्ये बिटा कॅरानिन आणि क जीवनसत्व विपुल असते. पालकाच्या आहाराने सुद्धा गाजरासारखेच उपयोग होतात. डोळ्यास उपयोगी पडणारा आणखी एक आहार म्हणजे संत्रे. त्यात लुटेन असते. ते आणि झिगझँतीन या द्रव्यांचा डोळे तेजस्वी करण्यास आश्‍चर्यकारक उपयोग होऊ शकतो. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये हे दोन द्रव्य तर असतातच, पण झिंक मोठ्या प्रमाणावर असते.

डोळ्यांसाठी आणखी एक महत्वाचे खाद्य म्हणजे मासे. माशांमध्ये सालमोन, सार्डिन, ट्यूना आणि मॅकरल हे मासे ओमेगा-३ आणि काही विशिष्ट प्रकारची चरबी धारण करून असतात. त्यामुळे दृष्टीची क्षमता वाढते आणि ज्यांचे डोळे कोरडे असतात त्यांना ओमेगा-३ सतत ओले ठेवते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment