उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रावरुन शरद पवारांचा राज्यपालांना टोला


मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरमरीत पत्र लिहिले आहे. तत्पूर्वी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक राज्यपालांनी पाठवले आहे. शरद पवार यांनी या पुस्तकाला अभिप्राय देताना खरमरीत त्यासाठी एक पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख करत लिहिलेल्या पत्रासंबंधी शरद पवार यांनी टोला लगावला आहे.

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार यांनी म्हटले आहे की, जनराज्यपाल असा उल्लेख भारतीय संविधानात आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवले याबद्दल धन्यवाद. एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपददस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र पुस्तकात आहेत. त्याचबरोबर राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना निधर्म वादासंदर्भात आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्याउपरांत या पुस्तकात केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद दिसून येत नसल्याची आठवण करुन देत शरद पवारांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

Loading RSS Feed