सूर्य प्रकाशाशी मैत्री करा


शरीराची त्वचा नितळ, गोरी दिसावी म्हणून महिला सूर्यप्रकाशात येण्याचे टाळतात. अनेक महिला प्रामुख्याने गृहिणी असल्यामुळे त्यांना घराबाहेर उन्हात फिरण्याची गरजही पडत नाही. पण उन्हाची तिरीप टाळण्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. स्वच्छ सूर्यप्रकाश हा ‘ड’ जीवनसत्वाचा अक्षम स्त्रोत असतो. सूर्यप्रकाश टाळणारांना हे जीवनसत्व मिळत नाही.

ड जीवनसत्व मिळवण्याचे इतरही मार्ग आहेत पण आपल्या बदलत्या आहाराच्या सवयीत ते आपल्याला मिळत नाही. मांसाहार, अंडी, दूध, डाळी याला ते मिळते. पण त्यांच्यासोबत चरबीही घ्यावी लागते. सूर्यप्रकाशाचे तसे नाही, त्यातून प्राप्त होणार्‍या ड जीवनसत्वासोबत इतर कोणतेही घातक पदार्थ आपल्या शरीरात जात नाहीत.

ड जीवनसत्वाच्या अभावाने होणारा सर्वात मोठा विकार म्हणजे हाडे ठिसूळ होणे. येत्या काही वर्षात या विकाराचे प्रमाण बरेच वाढणार आहे. महिलांमध्ये ते विशेष वाढते. २०१५ पर्यंत महिलांना ते २० टक्के तर पुरुषांत १० टक्के इतके होईल असा अंदाज आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment