केस काळे करणे घातक ठरू शकते


पांढर्‍या केसांना रंग देऊन तरुण असल्याचे भासवण्याचे वेड जगभर वेगाने पसरत आहे. परंतु त्यासाठी वारंवार केस रंगवत बसावे लागते आणि सतत बिझी असलेल्या लोकांना त्याचा त्रास वाटतो. म्हणून काही लोकांनी आता परमनंट हेअर डाईजचा शोध लावला आहे, जे काळे रंग केसांना फासले की, केस कायमचे काळे होतात आणि वारंवार केस रंगवण्याचे संकट टळते.

असे हे परमनंट हेअर डाईज उपयुक्त वाटत असले तरी ते कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकतात असा इशारा स्वीडनच्या लूंड विद्यापीठातील संशोधकांनी दिला आहे. या रंगांमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक आहेत. हा रंग लावणार्‍याला कर्करोग होण्याची भीती आहेच, परंतु ब्यूटी पार्लरमध्ये हे रंग लावण्याचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही तशी भीती आहे, असे या शास्त्रज्ञांच्या संंशोधनात आढळले आहे.

मध्यंतरीच्या काळात काही स्वयंसेवी संघटनांनी जगभरातील काही धोकादायक हेअर डाईज्ची यादी प्रसिद्ध केली होती. आता लूंड विद्यापीठात परमनंट हेअर डाईज वापरणार्‍या काही व्यक्ती आणि ब्यूटी पार्लरमध्ये काम करणार्‍या २९५ महिला यांच्या रक्ताने नमुने बारकाईने तपासले तेव्हा त्यांना कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे आढळले.

Loading RSS Feed
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment