रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण


नवी दिल्ली – भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ते विलगीकरणात राहुन रिझर्व्ह बँकेचे कामकाज सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वत:ला इतरांपासून दूर ठेवून आपण काम करत असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. त्यांच्या कोरोनाची लक्षणे वाटत नाहीत, पण त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना सावध केले आहे.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली असून बाह्य लक्षणांमुळे असे वाटत नाही. माझी तब्येतही ठीक आहे. पण माझ्या संपर्कात आलेल्यांना सतर्क करु इच्छितो. लोकांपासून दूर राहुन मी काम सुरु ठेवेन असे ट्विट शक्तिकांत दास यांनी केले. त्याचबरोबर सर्व डेप्युटी गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स आणि फोनवरुन संपर्कात राहीन, असे देखील ते म्हणाले. रिझर्व बँकेत बीपी.कानूनगो, एमके जैन, एमडी पात्रा आणि एम राजेश्वर राव हे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत. अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार सुस्थितीत राहण्यासाठी ते लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात विशेष सक्रीय राहीले. कोरोना संकटातून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पारंपारिक तसेच अपारंपारिक पद्धतींची मदत घेतली.