ज्येष्ठ वकील हरीश साळवे होताहेत विवाहबध्द

फोटो साभार नवभारत टाईम्स

भारताचे माजी सॉलीसिटर व सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील हरीश साळवे वयाच्या ६५ व्या वर्षी दुसऱ्यावेळी बोहल्यावर चढत आहेत. या आठवड्यात हा विवाह ब्रिटन साजरा होत आहे. साळवे याना जानेवारी २०२० मध्ये क्वीन्स कौन्सिल केले गेले आहे. साळवे यांनी पहिल्या पत्नी मीनाक्षी याना नुकताच घटस्फोट दिला आहे. २८ ऑक्टोबर रोजी ते एका चर्च मध्ये विवाह करणार असून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याचेही सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हरीश साळवे त्यांची ५६ वर्षीय मैत्रीण कॅरोलिना हिच्यासोबत विवाहबद्ध होत आहेत. कॅरोलिना कलाकार असून या दोघांची पहिली भेट एका आर्ट गॅलरी मध्ये झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली आणि आता त्याचे पर्यवसान विवाहात होत आहे. साळवे मुळचे नागपूरचे आहेत.

देशाचे सरन्यायाधीश बोबडे आणि हरीश साळवे नागपूर मध्ये एकाच शाळेत शिकले आहेत. देशातील अनेक चर्चित प्रकरणात साळवे यांनी नामवंत लोकांची बाजू मांडली आहे. मुकेश अंबानी, रतन टाटा, आयटीसी हॉटेल, वोडाफोन, बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या केसेस त्यांनी लढविल्या आहेत. महाराष्ट्रात गाजत असलेल्या टीआरपी घोटाळा व रिपब्लिक टीव्हीचा मालक अर्णव गोस्वामी याच्यातर्फे त्यांनी नुकतीच मुंबई हायकोर्टात त्याची बाजू मांडली होती.

१९७६ मध्ये साळवे दिल्लीत आले आणि २००२ पर्यंत ते सॉलीसीटर जनरल होते. आंतरराष्ट्रीय दाव्यात ते २००३ पासून काम करत असून भारताचा पाकिस्तानच्या कैदेत असलेला नौदल अधिकारी कुलभूषण यांची केस त्यांनी हेग न्यायालयात चालविली आहे. २०१३ मध्ये इंग्लिश बार मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती.