FAU-G Teaser | PUBG ची जागा घेणार अक्षय कुमारचा FAU-G गेम ?


मुंबई : रविवारी FAU-G या गेमचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे. या गेमचा टीझर दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. FAU-G चा टीझर सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमारने शेअर केला आहे. गलवान खोऱ्यात उड्डाण करणारे हेलिकॉप्टर या टीझरच्या पहिल्याच सीनमध्ये दिसत आहेत. नोव्हेंबर महिन्यात हा गेम लॉन्च होणार आहे.

अक्षय कुमारने टीझर शेअर करताना लिहिले आहे की, असत्यावर सत्याचा विजय असा आजचा दिवस निडर आणि एकतेचे प्रतिक असलेल्या फौजींसाठी जल्लोष साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगला कोणता दिवस असू शकतो? दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर फौजीचा टीझर सादर करत आहे.


दोन महिन्यांपूर्वी या गेमची अक्षय कुमारने घोषणा केली होती. अक्षय कुमारने त्यावेळी म्हटले होते की, मला पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचे प्रतिक गार्ड्स – फौजी. आपल्या सैनिकांचा त्याग खेळाडूंना मनोरंजनातून समजण्यास मदत होईल. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा 20 टक्के वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे.

Loading RSS Feed