मल्टी व्हिटॅमीन गोळीचा उपयोग

आपण शक्यतो जे काही खातो त्याच्या पोषण द्रव्यांची ङ्गार चौकशी करत नाही. मात्र काही जागरूक लोक तशी चौकशी करत असतात. तरी सुद्धा त्यांना सगळ्या प्रकारची पोषण द्रव्ये मिळतातच असे नाही. काही पोषण द्रव्यांची, एखाद्या व्हिटॅमीनची कमतरता राहून जाते. ती कमतरता भरून काढण्यासाठी दररोज सकाळी मल्टी व्हिटॅमीनची एक गोळी घ्यावी, असे डॉक्टर मंडळी सांगत असतात. त्यामुळे निदान काही रोगांना तरी आपण दूर ठेवू शकतो. दिवस भराच्या दगदगीने येणारा थकवा कमी होतो. मात्र या गोळ्यांच्या इतरही काही ङ्गायद्यांवर काही दिवसांपासून चर्चा होत आलेली आहे. विशेषत: मल्टी व्हिटॅमीनची एक गोळी नियमाने घेतल्यास कर्करोग होत नाही, असा दावा काही लोक करत होते. त्यांच्या या दाव्यावर वादविवाद होत आले आहेत. म्हणूनच अमेरिकेतल्या काही डॉक्टरांनी मल्टी व्हिटॅमीनची गोळी आणि कर्करोगाची शक्यता यांचा प्रदीर्घ काळ अभ्यास केला आणि त्यांच्या असे लक्षात आले की, मल्टी व्हिटॅमीनची गोळी आपल्याला कर्करोगापासून दूर ठेवण्यास अतिशय अल्प प्रमाणात का होईना मदत होते.

अमेरिकेतल्या काही डॉक्टरांनी या संबंधात १५ हजार लोकांवर १२ वर्षे प्रयोग केले आहेत. त्यातल्या काही लोकांना दररोज एक मल्टी व्हिटॅमीनची गोळी दिली आणि काही लोकांना तशीच नकली गोळी दिली. नकली गोळी म्हणजे त्यांना रोज एक गोळी खायला दिलीच, परंतु ती मल्टी व्हिटॅमीनची गोळी आहे असा केवळ भास होता. प्रत्यक्षात त्यात व्हिटॅमीन नव्हते. १० वर्षांच्या या प्रयोगानंतर असे आढळले की, रोज एक गोळी घेणार्‍या लोकांपेक्षा ती न घेणार्‍या लोकांना कोणताही कर्करोग होण्याची ८ टक्के जास्त शक्यता आहे. म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास दररोज एक मल्टी व्हिटॅमीनची गोळी घेतल्यास कर्करोग होण्याची शक्यता ८ टक्क्यांनी कमी होते. कॅन्सरवर या गोळीचा एवढा कमी परिणाम होत असला तरी त्यासाठी केलेली चाचणी प्रदीर्घ काळची, अनेक लोकांवर केलेली आणि आजवरच्या औषध निर्मितीच्या क्षेत्रातली सर्वात व्यापक अशी चाचणी होती. त्यामुळे मल्टी व्हिटॅमीन गोळीच्या अन्यही ङ्गायद्या-तोट्यांवर बराच प्रकाश पडला आहे.

दि जर्नल ऑङ्ग अमेरिकन मेडिकल असोसिएशन या मासिकामध्ये या व्यापक पाहणीचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. मल्टी व्हिटॅमीनची गोळी मुळात पोषण द्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी असते. त्यामुळे या पाहणीतून या संबंधात काय निष्पन्न झाले आहे याला महत्व आहे. कर्करोगाचे प्रमाण कमी होत असले तरी वैद्यकीय क्षेत्रामध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी यापेक्षाही अधिक परिणामकारक असे इतर उपायही उपलब्ध आहेत. लोकांनी कर्करोग होऊ नये यासाठी अशा गोळ्या घेत बसण्यापेक्षा सिगारेट ओढणे बंद करावे. त्यातून पैसेही वाचतील आणि कर्करोग होण्याची शक्यता कमी होईल. त्या पाठोपाठ दररोज व्यायाम करावा, आहार चांगला ठेवावा, अरबट चरबट खाणे बंद करावे. हे सारे उपाय सिद्ध झालेले आहेत. तेव्हा मल्टी व्हिटॅमीन गोळ्यांवर खर्च करण्यापेक्षा हे व्यसनांवरचे खर्च टाळून कर्करोगापासून बचाव करावा.

अमेरिकेमध्ये सध्या मल्टी व्हिटॅमीनच्या गोळ्या खाण्याची लाटच आलेली आहे. देशातले जवळपास ५० टक्के लोक व्हिटॅमीनचा पुरवठा करणारे कशा ना कशा प्रकारचे पुरवणी अन्न खात असतात. ३० टक्के लोक दररोज मल्टी व्हिटॅमीनची गोळी घेत असतात. त्यातल्या सर्वांना या गोळीचा काय ङ्गायदा होतो हे कधीच कळलेले नाही. परंतु काही लोकांनी ही गोळी ङ्गायदेशीर असते असे मानून त्यांचा ओव्हर डोस घेतलेला आहे. त्यांना या गोळीचे दुष्परिणाम मात्र भोगावे लागत आहेत. याच कारणाने अमेरिकेतल्या संंशोधकांना मल्टी व्हिटॅमीनच्या गोळीवरचे हे संशोधन करावेसे वाटले. अमेरिकेच्या सरकारने जारी केलेल्या आहार विषयक सल्ला देणार्‍या निवेदनामध्ये सुद्धा, मल्टी व्हिटॅमीनच्या गोळीने काही आजारांपासून संरक्षण होते असे सिद्ध झालेले नाही, असे नमूद केलेले आहे.

Loading RSS Feed
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment