पंकजा मुंडेंचा समर्थकांना व्हिडीओच्या माध्यमातून संदेश; सीमोल्लंघनासाठी सर्वजण सज्ज व्हा!


मुंबई : आपण दरवर्षी दसऱ्या मेळाव्याची वाट पाहत असता. या मेळाव्याची मी सुद्धा आवर्जुन वाट पाहत असते. पण, राज्यावर यंदा कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत असल्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. भगवानगडावर मी स्वत: जाऊन दर्शन घेणार आहे आणि तिथूनच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार असल्याची घोषणा पंकजा यांनी केली.

फेसबुक पेजवर व्हिडीओद्वारे सर्व समर्थक आणि भगवान भक्तांना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचा संदेश दिला आहे. आपल्या व्हिडीओमध्ये पंकजा मुंडे सांगतात, आपण दरवर्षीप्रमाणे दसऱ्या मेळाव्याची वाट पाहत असता. या मेळाव्याची मी सुद्धा वाट पाहत असते. ही परंपरा गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केली आहे, ती पुढे नेण्याची आपली जबाबदारी आहे. पण, यंदा राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थिती असल्यामुळे यंदा तुम्हा सर्वांचे आरोग्य मला धोक्यात घालायचे नसल्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत. आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी सर्वांना नतमस्तक व्हायचे आहे. भगवान बाबांचे पूजन करायचे आहे मोठ्या संख्येने हा कार्यक्रम करायचा असल्याचे आवाहन पंकजा मुंडेंनी केले.

सर्वांचे लक्ष माझा मेळावा कसा होणार याकडे आहे. कालच मराठवाड्याचा मी दौरा केला. तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. दसऱ्या मेळाव्याला दरवर्षी लाखोंची गर्दी जमा होत असते. सावरगाव येथे लाखो कार्यकर्ते हे भगवानगडावर जमा होत असतात, हा निर्णय त्यांच्या सुरक्षेसाठी घ्यावा लागला असल्याचेही पंकजा यांनी स्पष्ट केले. भगवानगडावर जाऊन मी स्वत: दर्शन घेणार आहे आणि तिथूनच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून येऊन तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. चला मग या नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजन तयार व्हा, असे आवाहन पंकजा यांनी केले आहे.