हळदीचे औषधी गुणधर्म


नवी दिल्ली – भारतीयांच्या खाण्यामध्ये आणि स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर कित्येक शतकांपासून केला जात आहे. या हळदीचे आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर चमत्कार वाटावा असे चांगले परिणाम होतात, असे संशोधकांचे मत आहे. हळदीच्या सेवनाने कर्करोग, मधुमेह इत्यादी रोगांचा मुकाबला करण्याची ताकद शरीरामध्ये येते. हळदीमध्ये हा गुणधर्म तिच्यातल्या करकुमीन या घटकामुळे असतो. याच घटकामुळे हळदीला पिवळा रंग येतो आणि त्याचे औषधी गुणधर्म वृद्धिंगत होतात. भारतीयांच्या वापरातल्या या जादुई वस्तूचे पाश्‍चात्य संशोधकांना आढळलेले काही महत्वाचे गुणधर्म असे आहेत.

– हळदीचा आपल्या आहारात पर्याप्त वापर केल्यास त्यामुळे पोटातील वायूचे त्रास कमी होतात आणि अल्सरच्या तक्रारीही मर्यादित राहतात.
– शरीरातल्या रक्ताच्या गुठळ्या होण्यावर हळद हे गुणकारी औषध आहे. रक्तवाहिन्या ताठ होणे किंवा निबर होणे यावर हळद उपयुक्त असते. म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या आणि रक्तवाहिन्या सक्त होणे यामुळे होऊ शकणार्‍या विकारांवर हळद गुणकारी ठरते.
– हळदीच्या प्राशनाने प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग तसेच काही प्रकारचे संधिवात टाळता येतात.
– शरीरातल्या इन्शुलीनची पातळी राखता यावी यासाठी हळद उपयुक्त ठरते. म्हणजेच मधुमेही रुग्णांनाही हळदीचा ङ्गायदा होतो.
– हळद हे नैसर्गिक ऍन्टिसेप्टिक आहे. त्यामुळे जखम भरून येण्यास तिचा उपयोग होतो आणि पचन संस्थेला सुद्धा हळद उपयुक्त ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment