
सध्या महागाईने परिसीमा गाठली आहे. सर्वसामान्य जनतेला दोनवेळचे अन्न व्यवस्थित मिळणे अवघड झाले आहे. अशा काळात नोकरी अथवा शेतीला पूरक असा जोडधंदा करणे काळाची गरज बनली आहे. महागाईच्या या भाराला आता लघुउद्योगाचा आधार घ्यावा लागणार आहे. थोडक्यात कोंबडी पालनाविषयीची माहिती अशी, कोंबडीपालन व्यवसायाचे भवितव्य हे कोंबडीघरावर बर्याच अंशी अवलंबून आहे. घरामध्ये नैसर्गिक हवा खेळती असावी. जमीन मुरमाड असावी. पक्षिघरांसाठी जमिनीच्या तुकड्याची कमीत कमी रुंदी 200 फूट असावी. पक्षिघराची दिशा ही नेहमी पूर्व – पश्चिडम असावी. पक्षिघर उभारताना त्यांना लागणार्या जागेचा विचार करून घर उभारावे. सुरवातीच्या काळामध्ये प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला 0.5 चौ. फूट जागा मिळावी. नंतरच्या कालावधीमध्ये प्रति पक्षी एक चौ.फटू जागा मिळेल अशाप्रकारे घर उभारावे. पक्षिघराची लांबी कितीही ठेवली तरी चालते; परंतु रुंदीवर मात्र मर्यादा येते. जास्तीत जास्त 30 फूट रुंदी असलेल्या घरात योग्य वायुविजन व प्रकाश राहतो. घराचा पाया दगड व चुन्यात बांधून पक्का केल्यास घराचा टिकाऊपणा वाढतो. घराची जमीन आजूबाजूच्या जमीन सपाटीपेक्षा एक फूट उंचीवर असल्यास घराला ओल येत नाही, तसेच जमीन काँक्रिटची पक्की तयार करून घ्यावी. जुने पक्षी गेल्यानंतर ती धुऊन स्वच्छ करण्यासाठी सोपे जाते.
