शास्त्रज्ञांना सापडल्या भूक नियंत्रित ठेवणारया पेशी

वजन जास्त असल्याने स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्न जगातील लाखो लोक करत असतात. पण अनेकदा त्यांना भूक लागल्याने ही ’डायटींग’ची टूम जास्त दिवस मिरवता येत नाही. आता मात्र तुम्हाला औषधांमार्फत आपल्या भूकेवर नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यामुळे लवकरच जशी भूक लागण्याची औषधं बाजारात मिळतात त्याप्रमाणे भूक न लागण्याचीही औषधंही बाजारात दिसून लागतील.

लंडनमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून मेंदूमधील खाण्याच्या सवयी नियंत्रीत करणा-या टेनिसायटीस पेशी समूहांचा शोध लावला आहे. याच पेशी भूक नियंत्रणाचे कार्य करतात असा दावा संशोधकांनी केला असून त्यांच्यामार्फत तयार होणा-या न्यूरॉन्समध्ये आपल्या खाणाच्या आवडीनिवडी आणि सवयींची माहिती साठवलेली असते. उंदीर, खार आणि अन्य प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगातून ही महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

या संशोधनात समोर आलेल्या माहितीमुळे मेंदूमधील मूळ पेंशीच्या माहितीमध्ये भर पडणार असून त्यामुळे भूकेवर नियंत्रण ठेवणा-या या टेनिसायटिस पेशींच्या न्यूरॉन्सची संख्या किती असते आणि त्यांची वाढ आणि कार्य काय असते याबद्दलच्या नवीन माहितीवर प्रकाश टाकला जाणार आहे. तसेच या न्यूरॉन्सला कट्रोल करणा-या औषधांची निर्मीती करण्यासाठीही या संशोधनाचा उपयोग केला जाणार आहे.

भुकेवर नियंत्रण करणा-या धमन्यांच्या लिंक्सची संख्या निश्चित नसल्याने खाण्याच्या विकारांवर उपाय करण्यासाठी या संख्येमध्ये बदल करता येऊ शकतो. या संशोधनामुळे स्थूलपाणाच्या समस्येवर ठोस उपाय शोधण्याचे नवीन मार्ग संशोधकांसमोर खुले झाल्याचे मत ईस्ट अँग्लिया विद्यापीठातील स्कलू ऑॅफ सोशल सायन्सचे मुख्य संशोधक मोहमद हाजी हुसेनी यांनी व्यक्त केले आहे.

या आधीचे संशोधन काय सांगते?

भूक जन्मतःच निश्चित असते. भूक नियंत्रित करणा-या मेंदूतील पेशी गर्भाच्या विकासाच्या वेळीच तयार होतात आणि नंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. किंवा तो करता येत नाही असे, ब्रिटनमधील ईस्ट अँग्लिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment