महाविकास आघाडी सरकारचा कंगणाकडून ‘गुंडा’असा उल्लेख


मुंबई : सध्या राज्यातील राजकीय वातावरण मंदिरे सुरु करण्यावरुन चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात लेटर वॉर सुरु असतानाच या वादात आता अभिनेत्री कंगना राणावतनेही उडी घेतली आहे. सोनिया सेना ही बाबर सेनेपेक्षा वाईट वागणूक देत असल्याची टीका कंगना राणावतने ठाकरे सरकारवर केली आहे.


गुंडा सरकारला माननीय राज्यपालांनी प्रश्न विचारला हे ऐकून फार छान वाटले. राज्यातील बार, रेस्टॉरंट्स या गुंडांनी सुरु केले आहेत. पण मंदिर अद्याप बंदच ठेवली आहेत. सोनिया सेनाही ही बाबर सेनेपेक्षा वाईट वागणूक देत असल्याचे ट्विट कंगना राणावतने केले आहे. त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारला गुंडा सरकारची उपमा कंगनाने दिली आहे.