मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून बाळासाहेब थोरांत यांचे थेट राज्यपालांना सवाल


मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेला वादा अद्याप शमलेला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून थेट राज्यपालांनाच सवाल केला आहे. गोव्याच्या राज्यपाल पदाचा भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे अतिरिक्त पदभार असून, त्यांनी असेच पत्र गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही लिहिले आहे का?, असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती राज्यपालांच्या विचारांशी सहमत आहेत का, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

राज्यपालांनी भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देव-देवतांना हिंदुत्ववादी असूनही टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात? असा सवाल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याला ठामपणे उत्तर दिले. घटनेतील धर्मनिरपेक्षता तुम्हाला मान्य नाही का? माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.


बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रावरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्र पाठवून दारुची दुकाने उघडली, तर मंदिरे बंद का? अशी विचारणी केली आहे. राष्ट्रपती राज्यपालांच्या या विचारांशी सहमत आहेत का? राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घालणे हे योग्य नाही. गोवा राज्याचाही कोश्यारी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरे बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.