राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण!


मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात कोरोनाची लक्षण असल्याने लीलावती रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सावध पावित्रा घेत मुंबईतील आमदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक रद्द केली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. पण त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या लिलावतीत उपचार सुरु आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील आमदारांची बैठक रद्द केली आहे.

उद्धव ठाकरेंनी आज वर्षा निवासस्थानी कोरोना, अनलॉकसह इतर राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदारांची बैठक बोलवली होती. मुंबईतील आमदार यात सहभागी होणार होते. पण अनिल परब यांना कोरोना झाल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांनी सावध पावित्रा घेत वर्षावर बोलावलेली आजची बैठक त्यांनी रद्द केली आहे.