आम्हीपण तुमचे बाप आहोत…; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला


पुणे – अजित पवार यांना जर पुणे महानगरपालिकेतील सत्तेबाबत काही स्वप्न पडत असतील, तर यासंदर्भात आपण आपली ऊर्जा वायाला घालवू नका, आम्ही पण तुमचे बाप असल्याचे म्हणत शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील कोथरूड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कार्यक्रमात बोलत होते.

चंद्रकांत पाटील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित म्हणाले, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असे आहेत ज्यांना २०१४च्या लोकसभा निवडणुकीत २८२ आणि २०२०च्या निवडणुकीत ३०३ खासदार आपले मिळाले आणि मदत करणारे सहयोगी खासदार सध्या १०३ वरुन १५३ आहेत, आपण अशा एका प्रचंड मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

काल पुणे महानगरपालिकेत झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाला. काहीतरी जादू करून या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व जागांवर भाजपचे अध्यक्ष झाले पाहिजे होते. पण तसे झाले नाही. पण पुढची काही तरी स्वप्ने अजित पवार यांना पडत आहेत, त्यांनी याबाबत जास्त ऊर्जा वायाला घालवू नये, आम्ही देखील अजित पवार यांचे बाप असल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला.