…तोपर्यंत ठाकरे सरकारने MPSC ची परीक्षा घेण्याचे घातकी धाडस करु नये


मुंबई – भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत MPSC ची परीक्षा घेण्याचे घातकी धाडस ठाकरे सरकारने करु नये, असा इशारा दिला आहे. मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सरकारने तरी देखील ११ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचा घाट अन्यायकारक निर्णय घेतला आहे. राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णयही आलेला आहे. ठाकरे सरकारला अशात एमपीएससीची परीक्षा घेण्याची एवढी घाई का आहे? असाही प्रश्न उदयनराजेंनी विचारला आहे. जितका मराठा समाज हा संयमी आहे तितकाच आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून MPSC च्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये असाही इशारा उदयनराजेंनी दिला आहे.

उदयनराजेंची पोस्ट