अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज


यंदा दिवाळीच्या मुहुर्तावर अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज होताच त्यात तुफान पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा ट्रेलर अक्षय कुमारनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्याने म्हटले आहे की. ‘लक्ष्मी बॉम्ब ऑफिशियल ट्रेलर, तुम्ही जिथे असाल तिथे थांबा आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यास सज्ज व्हा, ट्रेलर भयानक आणि कॉमेडीने परिपूर्ण आहे. ट्रेलर कसा वाटला, असेही त्याने चाहत्यांना विचारले आहे.


चित्रपटाच्या कथेचा अंदाज ट्रेलरमध्ये येतो. अक्षय चित्रपटात एका व्यक्तीच्या भूमिकेत आहे, जो भूतांना घाबरतो पण नंतर असे काही घडते की ट्रान्सजेंडरचा आत्मा त्याच्या शरीरात शिरतो. अक्षय कुमारचा ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे, ज्या दिवशी भूत माझ्यासमोर येईल, त्या दिवशी मी बांगड्या घालेन, त्यानुसार त्याचा बदलत गेलेला अंदाजात पाहायला मिळतो.

अक्षय कुमार ट्रेलरमध्ये मुलींप्रमाणे देहबोलीअसणे, मुलींप्रमाणेच हावभाव करत बोलणे अशा अंदाजा दिसतो. अक्षय कुमार त्याची मैत्रिणी कियारा अडवाणीच्या आई वडिलांसोबत राहतो. भूतांचा वास या घरातच असल्याचे जाणवू लागते. ट्रेलरमधील अक्षयचे काही सीन एवढे धडकी भरवणारे आहेत.

भारतातील चित्रपटागृहांमध्ये अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ रिलीज होणार नाही. पण हा चित्रपट न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील चित्रपटागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या देशांमधील चित्रपटागृहात हा चित्रपट ९ नोव्हेंबरला रिलीज केला जाईल. याची माहिती सिने समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर दिली. तर भारतातील लोक ९ नोव्हेंबरलाच हा चित्रपट डीज्नी हॉटस्टारवर बघू शकणार आहेत.

या चित्रपटातून अक्षय कुमार पहिल्यांदाच एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार आहे. अशात त्याचा हा एक्सपरिमेंट प्रेक्षकांना किती भावतो, हे आगामी काळातच स्पष्ट होईल. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी आणि तुषार कपूरही दिसणार आहे.