एमपीएससीची परीक्षा प्रलंबित ठेवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय


मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतरमंत्रिमंडळाची बैठक घेऊन एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत ही परीक्षा घेतली जाऊ नये अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली आहे.

या वर्षीच्या एमपीएससी परीक्षेला २ लाख ६० हजार विद्यार्थी बसणार होते. मराटह आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय परीक्षा होऊ नये अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील करोना संसर्गाचे संकट लक्षात घेता समग्र विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ दिलाने आवश्यक आहे त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलली जात आहे. परीक्षा कधी होणार याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. मराटह समाजाची मागणी डावलून ही परीक्षा घेतल्यास व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियेला सरकार जबाबदार आहे, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला. या घडामोडीनंतर राज्य सरकारने ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे.