प्रभास-दीपिकासोबत स्क्रिन शेअर करणार बिग बी


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नाग अश्विन दिग्दर्शित आगामी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास व बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण यांची जोडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. बिग बींची एण्ट्री या बिग बजेट चित्रपटात झाल्याने आता चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.


सोशल मीडियावर टीझर पोस्ट करत प्रभासने बिग बींसोबत काम करण्याविषयी आनंद व्यक्त केला. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्ताच आहे. माझे महानायक अमिताभ बच्चन सरांसोबत काम करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होत असल्याचे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटले आहे. तर याआधी ‘पिकू’ चित्रपटात बिग बींसोबत दीपिकाने काम केले होते.