‘यूजीसी’कडून बोगस विद्यापीठांची यादी जाहीर


नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २४ बोगस विद्यापीठांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीतील सर्वाधिक विद्यापीठे उत्तरप्रदेश आणि दिल्ली येथे आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोग कायद्याचे उल्लंघन करून या विद्यापीठांमध्ये स्वतःचे अभ्रासक्रम स्वतःच्या कार्यपद्धतीने चालविले जात आहेत. या अभ्रासक्रमांना मान्यता देण्यात आलेली नाही. त्यांना कोणतीही पदवी अथवा पदविका देण्याचा अधिकार नाही. याबाबत विद्यार्थी आणि पालकांना जागरूक करण्यासाठी यादी प्रसिद्ध केल्याचे यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सांगितले.

यापैकी ७ बोगस विदयापीठे दिल्ली येथे, तर ८ उत्तरप्रदेशात आहेत. ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथे प्रत्येकी २, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पॉंडेचरी येथे प्रत्येकी १ बोगस विद्यापीठे आहेत.