राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतर


मुंबई: केंद्राने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली असली तरीही त्याबाबत घाई न करता दिवाळीनंतर राज्यातील करोनास्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत विचार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील सध्याची करोनाची स्थिती लक्षात घेता सध्या शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असेच मत बहुतेक मंत्र्यांनी बैठकीत मांडले. अनेक देशांमध्ये शाळा, महाविद्यालये खुली केल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी करोनाबाधित झाल्याकडे काही मंत्र्यांनी लक्ष वेधले.

केंद्राने दि. १५ ऑकटोबरपासून शाळा खुल्या करण्यास परवानगी दिली असली तरी राज्यांना करोना संसर्गाची स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार दिवाळीनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याचे मंत्रिमंडळाने ठरवले आहे.