२४ तासांतच कोळी महिलांना दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला; परप्रांतीयांना दिला मनसे दणका


मुंबई: परप्रांतीय मच्छीविक्रेत्यांनी मुंबईतील डोंगरी मासळी बाजाराबाहेर मोठ्या प्रमाणात केलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न घेऊन काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कोळी महिलांनी भेट घेतली होती. त्यांच्यासाठी राज ठाकरे हे स्वत: कृष्णकुंज बाहेर आले आणि कोळी महिलांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.


आमच्या व्यवसायाला परप्रांतीय विक्रेत्यांच्या मुजोरीमुळे मोठा फटका बसत असल्याचे गाऱ्हाणे या कोळी महिलांनी मांडले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी राज ठाकरे यांच्याकडे त्याबेकायदा मच्छीविक्रेत्यांना हटवा, अशी मागणी केल्यानंतर कोळी महिलांची तक्रार ऐकून घेतली व राज ठाकरे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर मनसेच्या स्थानिक विभागाध्यक्ष संजय नाईक यांनी २४ तासांतच बेकायदा मच्छीविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिल्याची माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.