‘मिर्झापूर-२’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला


नुकताच बहुप्रतिक्षित ‘मिर्झापूर 2’ या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. गुन्हेगारी विश्वावर आधारित असलेली ही वेबसीरिज आता या दुसऱ्या पर्वामध्ये वेगळे वळण घेताना दिसणार आहे. या सीरिजमध्ये आता रिव्हेंज ड्रामा पाहायला मिळणार आहे. गुड्डूला ‘मिर्झापूर’ या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये गोळ्या लागल्या होत्या. पण सुदैवाने तो बचावतो. आता गुड्डूचा कालीन भैय्या आणि मुन्ना याचा ‘मिर्झापूर २’मध्ये सामना होणार आहे. तसेच आता रती शंकरचा मुलगाही गुड्डू पंडितचा शोध घेत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. ‘मिर्झापूर २’च्या २ मिनिट ४८ सेकंदाचा ट्रेलरपाहून चाहत्यांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता वाढली आहे.

पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा यांच्या ‘मिर्झापूर २’ या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहेत. मिर्झापूर 2 या वेबसीरिजचा दुसरा सिझन २३ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कालीन भैय्या, मुन्ना भैय्या आणि गुड्डू भैय्या यांच्यातील जबरदस्त टक्कर या दुसऱ्या सिझनमध्ये पाहण्यास मिळणार यात काही शंकाच नाही. मिर्झापूरमध्ये उत्तरेकडील राजकारण आणि त्यातून येणारी गुंडगिरी याचे उत्तम चित्रीकरण करण्यात आले होते. त्यामुळे ‘मिर्झापूर २’साठी चाहते आता उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.