मक्का ७ महिन्यांनंतर भाविकांसाठी खुली

फोटो साभार भास्कर

सौदी अरेबियाने करोना मुळे गेले सात महिने बंद असलेली मक्का रविवार पासून मुस्लीम समाजाच्या पवित्र उमरासाठी खुली केली आहे. मक्का येथील यात्रा मुस्लीम समाजात अतिशय पवित्र आणि महत्वाची यात्रा मानली जाते. अर्थात मक्का खुली करताना करोनाचा संसर्ग लक्षात घेऊन सर्व ते खबरदारीचे उपाय योजले गेले आहेत. मक्का दर्शन तीन टप्प्यात खुले केले गेले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सौदी येथील ६ हजार भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी दिली गेली असून दुसरा टप्पा १८ ऑक्टोबर पासून खुला होत आहे. यात दररोज १५ हजार झायरी आणि ४० हजार नमाजी जाऊ शकणार आहेत.

१ नोव्हेंबर पासून अन्य देशातील मुस्लीम मक्केत येऊ शकतील असे समजते. सौदी मध्ये करोना बाधितांची संख्या ३ लाख ३५ हजारावर गेली आहे आणि ४८५० लोकांचा करोनाने बळी घेतला आहे. उमरा साठी दरवर्षी जगातून लाखो मुस्लीम मक्का येथे येतात. यंदा सौदीतील १ हजार लोकांना हज साठी परवानगी दिली गेली होती.