हाथरस गँगरेप : पोलिसांकडून मध्यरात्री पीडितेवर अंत्यसंस्कार, घरात बंद केल्याचा कुटुंबियाचा दावा

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेवर काल मध्यरात्री उत्तर प्रदेश पोलिसांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना घरात बंद केले होते, असा आरोप केला जात आहे. या दरम्यान पोलीस आणि पीडितेच्या कुटुंबियांमध्ये वाद देखील झाला. मृताचे नातेवाईक स्वत: मृतदेह आणणार्‍या रुग्णवाहिकेसमोर उभे राहिले आणि गाडीच्या बोनटवर आडवे झाले, परंतु पोलिसांनी त्यांना बाजूला करुन पीडितेवर अंत्यसंस्कार केले. याबाबतचे वृत्त एनडीटिव्हीने दिले आहे.

मृत युवतीच्या भावाचा आरोप आहे की त्यांना न सांगता पोलीस शव घरापासून लांब घेऊन गेले व गपचूप अंत्यसंस्कार केले. पीडितेचे वडील आणि भाऊ पोलिसांवर कारवाई करावी यासाठी निदर्शन करत होते. गावकऱ्यांनी देखील पोलिसांच्या कारवाईचा विरोध केला.

काल युवतीच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलच्या बाहेर लोकांना जोरदार विरोध प्रदर्शन केले व दोषींना फाशी देण्याची मागणी केली. कुटुंबाने युवतीचा मृतदेह आपल्याकडे सोपवण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी असे न करता मध्यरात्री जबरदस्तीने युवतीवर अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक केले आहे व त्यांच्या सामूहिक बलात्कार आणि हत्याचे आरोप लावण्यात आले आहे. युवतीच्या कुटुंबाचा आरोप आहे की पोलिसांनी सुरुवातीला त्यांची मदत केली नाही.