देशातील आदर्श वजनाची संकल्पना बदलली, पुरूष-महिलांसाठी हे आहे योग्य वजन परिमाण


वेळेनुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत जातो. व्यक्तीच्या खाण्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्वच गोष्टी कालांतराने बदलत जात असतात. आता भारतीय महिला आणि पुरुषांसाठी आदर्श वजन व उंची किती असावी याचे देखील परिमाण बदलले आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने भारतीयांसाठी आदर्श असलेल्या वजनात अधिक 5 किलोचा समावेश केला आहे. 2010 मध्ये भारतीय पुरुषांसाठी 60 किलो वजन योग्य मानले जात असे, जे आता 65 किलो करण्यात आले आहे. तर महिलांचे वजन 55 किलो असावे असे म्हटले आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने केवळ भारतीय महिला आणि पुरुषांसाठी आदर्श वजनच नाही तर उंची देखील सांगितली आहे. एक दशकांपुर्वी भारतीय पुरुषांची उंची 5 फूट 6 इंच व महिलांची उंची 5 फूट योग्य होती. ज्यात आता वाढ करून नवीन रेफरेंसनुसार पुरुषांची उंची 5 फूट 8 इंच आणि महिलांची उंची 5 फूट 3 उंच आदर्श मानण्यात आली आहे. म्हणजेच देशातील लोकांचे बॉडी मास इंडेक्स (BMI) आता बदलले आहे.

बीएमआयमध्ये बदल करण्याचे कारण सांगताना वैज्ञानिक म्हणाले की, लोकांचे पोषख खाद्यपदार्थ सेवन वाढले आहे. यावर्षी ग्रामीण व शहरी भागातील डेटाचा देखील समावेश करण्यात आला आहे. 10 वर्षांपुर्वी केवळ शहरी भागातील डेटाचा वापर करण्यात आला होता. इंस्टिट्यूटने  आपल्या 2020 च्या अहवालात आहार भत्ता (आरडीए) आणि भारतीयांसाठी पोषण आहाराची अंदाजे सरासरी आवश्यकता (ईएआर) देखील बदलली आहे.

देशातील महिला आणि पुरुषांच्या रेफरेंस एजला देखील बदलण्यात आले असून, याला 2010 च्या 20-39 च्या जागी आता 19-39 करण्यात आले आहे. पोषणविषयी देखील आयसीएमआरच्या तज्ञांनी काही बदल केले आहेत. 2000 किलो कॅलरीसचे सेवन सुरक्षित मानण्यात आले आहे. प्रौढ पुरुष आणि महिलांसाठी दिवसाला 1000mg कॅलिशियम आवश्यक आहे. स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी यात 200mg यात वाढ करता येते. सर्वसाधारण मीठाचे प्रमाण दिवसाला 5 ग्रॅम्स असावे, तर सोडियमचे प्रमाण 2 ग्रॅम्सपेक्षा अधिक नसावे. याशिवाय दिवसाला 3,510mg पोटेशियमची देखील शिफारस करण्यात आली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही