पृथ्वीवर दर २५० लोकांमागे १ करोना बाधित

फोटो साभार मिंट

वल्डोमीटरने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीच्या विश्लेषणातून पृथ्वीवर दर २५० लोकांमागे एक व्यक्ती करोना बाधित असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी हा निष्कर्ष जाहीर केला गेला. संयुक्त राष्ट्र संघाच्या माहितीवर हा डेटा आधारित आहे.

टास समाचार नुसार रविवारी आलेल्या माहितीनुसार गेल्या सात दिवसात करोनामुळे ३७ हजार मृत्यू झाले असून मृतांची एकूण संख्या ९,८३,००० झाली आहे. जगाची सध्याची लोकसंख्या ७.८ अब्ज आहे. करोनाचे संक्रमण असेच वाढत राहिले तर मृतांची संख्या २० लाखांवर जाऊ शकते असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जॉन हॉपकिन विश्वविद्यालय डेटा नुसार अमेरिकेत जगात सर्वाधिक ७,११५,३३८ करोना संक्रमित असून त्यातील २,०४,७५८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल भारतात करोना संक्रमितांची संख्या ६० लाखांवर गेली असून ९५५४२ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात करोना मुक्तांची संख्या ५० लाखावर गेली असल्याचेही नमूद केले गेले आहे.