करोनापासून संरक्षण देण्यात फेसशिल्ड प्रभावी नाही

करोना पासून बचावासाठी प्लास्टिक फेस शिल्डचा वापर परिणामकारक नसल्याचा अहवाल जपानी सुपर कॉम्पुटर फुगाकू ने दिला आहे. करोनापासून बचावासाठी मास्क, ग्लोव्हज, सोशल डीस्टन्सिंगचे पालन जगभरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत. अनेक जण फेसशिल्डचा वापर याच कारणासाठी करत आहेत. विशेषत: जेथे डॉक्टर अथवा अन्य आरोग्य कर्मचारी किंवा सार्वजनिक कार्यालये जेथे काम करणारे सोशल डीस्टन्सिंगचे पालन करू शकत नाहीत तेथे फेसशिल्ड वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे.

मात्र हे प्लास्टिक फेस शिल्ड करोना संसर्ग रोखण्यास असमर्थ आहे असे सुपर कॉम्पुटर फुगाकूचे निष्कर्ष सांगतात. यासाठी एक सिम्युलेशन टेस्ट घेण्यात आली. त्यानुसार कोविड १९ पासून बचावासाठी जे प्लास्टिक फेस शिल्ड चेहऱ्यावर लावले जात आहे ते एरोसोल म्हणजे हवेतून येणारे ड्रॉपलेट विषाणू जखडून ठेवण्यास समर्थ ठरत नसल्याचे दिसून आले आहे. जपान मध्ये नवजात बालकांना सुद्धा फेस शिल्ड लावले जात आहेत. फेसशिल्ड पेक्षा योग्य मास्क अधिक सुरक्षित असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.