जिओचा धमाका, नवीन प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार मिळणार मोफत


रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन पोस्टपेड प्लॅनची घोषणा केली आहे. हे प्लॅन जिओ पोस्टपेड प्लस नावाने आणण्यात आले आहेत.  कंपनीने 5 प्लॅन्स लाँच केले असून, यातील सुरुवातीचा पोस्टपेड प्लॅन 399 रुपयांचा आहे. या प्लॅन्सची खास गोष्ट म्हणजे यात ग्राहकांना नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत स्बस्क्रिप्शन मिळणार आहेत.

399 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये 75 जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजची सुविधा मिळेल. याशिवाय नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे स्बस्क्रिप्शन मोफत मिळेल. प्लॅनमध्ये 200 जीबी डेटा रोलओव्हर केला जाईल.

599 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये 100 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा मिळेल. तसेच, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे स्बस्क्रिप्शन मिळेल. यात 200 जीबी डेटा रोलओव्हर केला जाईल आणि फॅमिली प्लॅनसोबत 1 सिम कार्ड देखील मिळेल.

799 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये 150 जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा मिळेल. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपी या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे स्बस्क्रिप्शन मोफत मिळेल मिळेल. याशिवाय 200 जीबी डेटा रोलओव्हर केला जाईल आणि फॅमिली प्लॅनसोबत 2 सिम कार्ड देखील मिळेल.

999 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये 200 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा मिळेल. तसेच, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे स्बस्क्रिप्शन मिळेल. यात 500 जीबी डेटा रोलओव्हर केला जाईल आणि फॅमिली प्लॅनसोबत 3 सिम कार्ड मिळतील.

1,499 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनमध्ये 300 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा मिळेल. तसेच, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे स्बस्क्रिप्शन मिळेल. यात 500 जीबी डेटा रोलओव्हर केला जाईल. याशिवाय अमेरिका आणि यूएईमध्ये देखील अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळेल.