अभिनेत्री पायल घोषने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाचे दिग्दर्शक अनुराग कश्यपकडून खंडन


दिग्दर्शक अनुराग कश्यपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री पायल घोषने लैंगिक शोषणाचा आरोप केला असून ट्विट करून दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही आरोप फेटाळून लावले आहे. पायलचे आरोप बिनबुडाचे असून थोडी तरी मर्यादा बाळगा, असे अभिनेत्रीला अनुराग कश्यपने सुनावले आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने ट्विट करून अभिनेत्री पायल घोषने केलेल्या लैंगिक छळाचा आरोपाचे खंडन केलं आहे.


अनुरागने आपल्या ट्विटमध्ये मला शांत करण्याच्या प्रयत्नात इतके खोटे बोलले की ती एक स्त्री असून देखील या वादात इतर महिलांना ओढून घेतले. थोडी मर्यादा राखा मॅडम. यावर मी फक्त एवढच म्हणेल की, तुमचे सर्व आरोप निराधार आहेत. मॅडम माझे दोन विवाह झाले आहेत, जर दोन विवाह करणे गुन्हा असेल, तर तो मला मान्य आहे. मी खूप प्रेम केले आहे, हे देखील मी मान्य करतो. माझी पहिली पत्नी असो किंवा दुसरी. तसेच ज्या अभिनेत्रींसोबत मी काम केले आहे किंवा माझ्या टीममध्ये काम करणाऱ्या महिला.


मी कोणत्याच महिलेसोबत गैरवर्तन केले नाही आणि त्याचे समर्थन देखील करत नाही. तुमचा व्हिडीओ पाहिल्यानंतर खर काय आहे ते कळते. तुम्हाला खूप प्रेम आणि आशिर्वाद. बाकी तुमच्या इंग्रजीचे उत्तर हिंदीमध्ये दिले याबद्दल माफी. ही तर सुरूवात आहे. अजून बरेच हल्ले होणार आहे. भरपूर फोन आले की, काही बोलू नको, मला शांत राहण्याचा सल्ला दिला. माहीत नाही कधी कोण कशापद्धतीने माझ्यावर टीका करेल, असे अनुराग आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.