अक्षयच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली, या दिवशी होणार ‘लक्ष्मी बॉम्ब’चा धमाका


अक्षय कुमारने काल आपला मुलगा आरवच्या वाढदिवशी चाहत्यांना स्पेशल सरप्राइज दिले आहे. अक्षय कुमारने आपला बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट लक्ष्मी बॉम्बची रिलीज तारीख जाहीर केली आहे. चित्रपट दिवाळीच्या मुहर्तावर ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

अक्षयने पोस्ट शेअर करत लिहिले की, या दिवाळीत तुमच्या घरी लक्ष्मीसोबत एक धमाकेदार बॉम्ब देखील येणार आहे. येत आहे लक्ष्मी बॉम्ब 9 नोव्हेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर. सोबतच अक्षयने चित्रपटाचा टीझर देखील शेअर केला असून, यात लक्ष्मण ते लक्ष्मीपर्यंतच्या प्रवासाची झलक दिसत आहे.

लक्ष्मी बॉम्ब येत्या 9 नोव्हेंबरला चाहत्यांच्या भेटीला येत आहे. कोरोना व्हायरसमुळे थिएटर बंद असल्याने चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली होती. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असून, यात अक्षय कुमारसोबत कियारा आडवाणी देखील दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेंसने केले आहे.