भीषण स्फोटानंतर आता बैरुतमध्ये आगीचे तांडव


लेबनानची राजधानी बैरुतमध्ये मागील महिन्यात भीषण स्फोट झाला होता. हजारो टन अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे संपुर्ण शहर उध्वस्त झाले होते. 190 लोकांचा मृत्यू आणि हजारो लोक बेघर झाले होते. यानंतर आत बैरुत बंदरावर भीषण आग लागली आहे. आगीमुळे आकाशात उंच ज्वाळा उठताना दिसत आहेत. स्फोटानंतर बैरुतमधील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.

गोदामात ठेवलेल्या ऑइल आणि टायरला लागलेल्या या आगीमुळे ही घटना घडली असल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे.  धूराच्या प्रचंड लोटामुळे आकाश भरून गेल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या भीषण आगीने 4 ऑगस्टला झालेल्या स्फोटाच्या आठवणी ताज्या केल्या.

आगीमुळे लोक घाबरून सैरावेैरा पळत सुटले होते. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहचल्या आहेत. अद्याप या घटनेत जखमी झालेल्यांची माहिती समोर आलेली नाही.