कंगनाशी वैयक्तिक वाद नाही, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे – संजय राऊत

अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या विधानानंतर राजकीय नेत्यांनी कंगनावर जोरदार टीका केली. या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कंगना राणावतमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. यावर बोलताना आता संजय राऊत यांनी आता कंगनाशी कोणताही वैयक्तिक वाद नसून, हा महाराष्ट्राचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

आज तकशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कंगनासोबत कोणताही वैयक्तिक वाद नाही. हा महाराष्ट्राचा विषय होता. तिने आपल्या ट्विटर हँडलचा उपयोग स्वतः करायला हवा, एखाद्या राजकीय पक्षाला ट्विटर हँडलचा उपयोग करण्यास देऊ नये. हा केवळ महाराष्ट्राचा मुद्दा नाही. महाराष्ट्राच्या प्रश्नावर सर्वांनी एकसोबत यायला हवे.

मुंबई शिवसेनेच्या बापाची का? कंगनाची पाठराखण करत या भाजप नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

कंगनाने संजय राऊत यांना उत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. आपण 9 सप्टेंबरला मुंबई येणार असून, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा असेही म्हटले होते.

यावर संजय राऊत म्हणाले होते की, मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहणार नाही.