मुंबई शिवसेनेच्या बापाची का? कंगनाची पाठराखण करत या भाजप नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने अभिनेत्री कंगना राणावत वादात अडकली आहे. कंगना विरुद्ध शिवसेना या वादात आता भाजप नेते आणि हरियाणा सरकारमधील गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज यांनी देखील उडी घेतली आहे. शिवसेनेचे नेते कोणाला सत्य बोलण्यापासून रोखू शकत नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

कंगनाच्या समर्थनात उतरलेले विज शिवसेनेव जोरदार हल्ला करत म्हणाले की, मुंबई काय शिवसेनेचा खाणदानी प्रदेश आहे, का त्यांची बापाची आहे ? मुंबई हा भारताचा भाग असून, कोणीही तेथे जावू शकते. जे कोणी या प्रकारच्या धमक्या देत आहे, त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी.

अनिल विज म्हणाले की, कंगना राणावतला पोलीस संरक्षण दिले जावे. तिला मोकळेपणाने सत्य बोलण्याची परवानगी द्यावी. तुम्ही कोणाला सत्य बोलण्यापासून रोखू शकत नाही.

दरम्यान, कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने वाद चांगलाच चिघळला असून, नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांना कंगनावर टीका केली आहे. काहींनी कंगनाला पुन्हा मुंबईत परतू नकोस असा इशारा देखील दिला.