‘द रॉक’ फॅमिलीची कोरोनावर यशस्वीरित्या मात


‘द ममी रिटर्न्स’, ‘बेवॉच’ आणि ‘जुमांजी’ सारख्या हॉलिवूड चित्रपटात झळकलेला प्रसिद्ध अभिनेता ‘द रॉक’ ड्वेन जॉनसनसह त्याच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली होती, पण आता द रॉक आपल्या कुटुंबासह कोरोनामुक्त झाला असल्याची ही माहिती ड्वेनने सोशल मीडियाद्वारे दिली. त्याने गुरुवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन सांगितले की, त्याच्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलींना सुमारे अडीच आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांची प्रकृती खालावली होती. पण आता सर्वजण पूर्णपणे बरे झाले आहेत.

‘द रॉक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या 48 वर्षीय जॉनसनने दिलेल्या माहितीनुसार जवळपास अडीच आठवड्यांपूर्वी तो, त्याची 35 वर्षीय पत्नी लॉरेन आणि दोन मुली जास्मीन (4) आणि टिआना (2) यांना कोरोनाची लागण झाली होती. एका जवळच्या मित्राच्या संपर्कात आल्याने त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पण त्यांना आपल्या मित्राला कोरोना संक्रमण कसा झाला याबद्दल माहिती नाही.

‘द रॉक’ व्हिडिओमध्ये सांगतो, आमच्यासाठी हा सर्वात कठीण आणि आव्हानात्मक काळ होता. माझ्या संपूर्ण कुटुंबाने विशेषतः मी ज्याचा सामना केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलींच्या घशात खवखव झाली होती, पण त्या लवकरच ब-या झाल्या. पण त्याची आणि पत्नी लॉरेनची प्रकृती खालावली. आता संपूर्ण कुटुंब ठीक असल्याचे सांगताना मला खूप आनंद होत आहे. आता आम्ही कोरोनामुक्त झाले आहोत. आम्ही बरे आहोत याबद्दल देवाचे आभार मानतो.

ड्वेन जॉनसनने व्हिडिओमध्ये लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. काही राजकारण्यांसह काही लोक मास्क घालण्याची कल्पना आणतील आणि त्यास राजकीय अजेंडा बनवतील हे पाहून मला आश्चर्य वाटले. खर म्हणजे ती योग्य गोष्ट आहे आणि मास्क घालणे ही एक जबाबदारी असल्याचे त्याने म्हटले आहे. व्हिडिओला कॅप्शन देताना रॉकने लिहिले, सर्व लोकांसाठी माझा संदेश – शिस्तबद्ध रहा. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवा. निरोगी राहण्यास वचनबद्ध. मास्क घाला. आपल्या घरात रहा. सकारात्मक रहा आणि आपल्याबरोबर लोकांची काळजी घ्या.