राखी सावंतची महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीवर आगपाखड


आपल्या अतरंगी तसेच वादग्रस्त वक्तव्यांमुळे बॉलिवूडची ड्रामा क्विन अर्थात अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. पण यावेळी सुशांत मृत्यू प्रकरणाचे निमित्त साधून तिने अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि निर्माता महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने रियाची खिल्ली उडवताना माझ्या स्वप्नांना कॉपी करु नकोस कारण तुझ्या पापांचा घडा आता भरल्याचे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

रिया चक्रवर्तीची सुशांत मृत्यू प्रकरणात सीबीआयमार्फत चौकशी सुरु आहे. दरम्यान राखी सावंत हिने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन महेश भट्ट यांची खिल्ली उडवली आहे, त्याचबरोबर रियावर देखील जोरदार टीका केली आहे.

तू माझ्या स्वप्नांची नक्कल करु नकोस, रिया चक्रवर्ती. कारण तुझ्या पापांचा घडा आता भरला आहे. सुशांतला नियोजनबद्ध पद्धतीने तू आणि तुझ्या कुटुंबीयांनी मिळून फसवले. पण आता तुम्ही जास्त दिवस वाचू शकणार नाही. लवकरच तुम्हाला सीबीआय गजाआड पाठवेल. आता खोटे बोलून काहीही फायदा नाही, रिया तूझे सत्य संपूर्ण जगाला कळलेले असल्यामुळे उगाचच माझी नक्कल करण्याचा प्रयत्न करु नकोस, असा इशारा राखीने या व्हिडीओद्वारे रियाला दिला आहे. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.