अभिनेत्री रिया चक्रवर्तीची अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. याच दरम्यान दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. परिणामी सोशल मीडियाद्वारे सुशांतच्या चाहत्यांनी रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. पण अभिनेत्री विद्या बालनला ही टीका आवडलेली नाही. रियाचे समर्थन करत तिने देत टीकाकारांवर संताप व्यक्त केला आहे. ती जोपर्यंत निर्दोष आहे, असे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही तिला दोषी समजणार का? असा सवाल तिने टीकाकारांना विचारला आहे.
सुशांत मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीचे विद्या बालनकडून समर्थन
सुशांतचा मृत्यू ही अत्यंत दुदैवी घटना आहे. पण या प्रकरणाला आता माध्यमांनी जणू सर्कसच बनवले आहे. रियाला एक महिला म्हणून पाहून मला खूप दु:ख होते. वाट्टेल तशी टीका तिच्यावर केली जात आहे. ती जोपर्यंत निर्दोष आहे, असे सिद्ध होत, नाही तो पर्यंत तुम्ही तिला दोषी समजणार का? अशा आशयाचे ट्विट करुन विद्या बालनने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे हे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.