‘कधीच हार मानणार नाही’, शार्ली हेब्डोने पुन्हा छापले मोहम्मद पैगंबरांचे कार्टुन

2015 साली पॅरिस येथील व्यंग साप्तहाकि शार्ली हेब्डोच्या कार्यालयावर दोन दहशतवादी भावांनी गोळीबार केला होता. या घटनेत 12 लोकांचा मृत्यू झाला होता. यात अनेक प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्याने हा हल्ला करण्यात आला होता. आता साप्ताहिक शार्ली हेब्डोने मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र पुन्हा प्रकाशित एकदा प्रकाशित केले आहे.

साप्ताहिकाने म्हटले की, आम्ही व्यंगचित्र पुन्हा प्रकाशित करत आहोत, जेणेकरून गुन्हेगारांविरोधात या आठवड्यात सुनाणी सुरू होईल. साप्ताहिकाचे डायरेक्टर लॉरेंट रिस सॉरिस्यू मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र पुन्हा प्रकाशित करण्याविषयी म्हणाले की, आम्ही झुकणार नाही व आम्ही कधीच हार देखील मानणार नाही.

2015 साली या साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याने पॅरिससह संपुर्ण जग हादरले होते. दहशतवाद्यांनी एका सुपरमार्केटला देखील निशाणा बनवले होते. या प्रकरणाची सुनावणी आजपासून सुरू होत आहे. साप्ताहिकाच्या लेटेस्ट एडिशनच्या पहिल्य पृष्ठावर डझनभर व्यंगचित्र आहेत. त्यात मोहम्मद पैंगबर यांचेही व्यंगचित्र आहे.