
नवी दिल्ली – सोमवारी सायंकाळी माजी राष्ट्रपदी प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. असून त्यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून दिल्लीतील आर्मी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा अभिजीत यांनी ट्विट करुन दिली आहे.
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींचे निधन
त्यांच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. व्हेंटिलेटर सपोर्टवर त्यांना ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज अखेर त्यांचा मृत्यूसोबत सुरू असलेला संघर्ष संपला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
२०१२ ते २०१७ या काळात प्रणव मुखर्जी यांनी देशाचे राष्ट्रपतीपद सांभाळले होते. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेसप्रणित सरकारमध्ये अर्थ, संरक्षण, परराष्ट्र यासह विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. तसेच त्यांनी लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्याबरोबरच विविध संसदीय समित्यांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली होती. प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
