आशेचा किरण; डुक्करांच्या शरीरात लिव्हर विकसित करण्यात वैज्ञानिकांना यश

यकृत अर्थात लिव्हर शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे. अनेकदा आजारमुळे लिव्हर खराब झाल्याने प्रत्यारोपण केले जाते. मात्र भविष्यात असे करण्याची गरज भासणार नाही, अशी शक्यता आहे. अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी शरीरातच लिव्हर विकसित करण्यात यश मिळवले आहे. सध्या त्यांनी डुक्करांमध्ये असे केले असून, त्यांना विश्वास आहे की लवकरच मनुष्यामध्ये देखील असे करता येईल. यामुळे लिव्हर प्रत्यारोपणाची गरज पडणार नाही.

Image Credited – amarujala

पिट्सबर्ग यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी 6 डुक्करांच्या लिम्फ नोडमध्ये पुर्ण आकाराचे लिव्हर विकसित करण्यास यश मिळवले आहे. ट्रायल दरम्यान त्यांना आढळले की प्राण्यांचा जर एखादा अवयव आजारामुळे खराब होण्यास सुरुवात झाली तरीही ते स्वस्थ असतात व त्यांच्या अंगात दुसरे अवयव विकसित होण्याची क्षमता असते. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, लिव्हरमध्ये स्वतःला विकसित करण्याची क्षमता असते. वैज्ञानिकांनुसार याचा एक भाग प्रत्यारोपण केल्यास शरीरातच एक पुर्ण लिव्हर विकसित होईल. शरीरातील लिम्फ नोडमध्ये लिव्हर पेशींना विकसित करता येते. पेशींची संख्या वाढते आणि एक संपुर्ण लिव्हर तयार होते.

Image Credited – amarujala

वैज्ञानिकांनी यासाठी अशा सहा डुक्करांनी निवडले ज्यांचे लिव्हर निकामी झाले होते. त्यांच्या रक्त प्रवाहाचा मार्ग बदलण्यात आला आणि शरीरातील लिव्हर पेशींचा एक भाग घेण्यात आला. याला हिपॅटोसायट्स म्हणतात. वैज्ञानिकांनी याच पेशींना लिम्फ नोडमध्ये प्लांट केले. नवीन विकसित लिव्हर आधीच्या लिव्हरच्या तुलनेत अधिक मोठे होते.

लिव्हर ट्रांसप्लांटेशन जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार हेपेटाइटिस संक्रमण, दारू इत्यादीमुळे मनुष्याचे लिव्हर खराब होते. असाच एक प्रयोग उंदरांवर करण्यात आला होता. त्यानंतर 10 वर्षांनी आता डुक्करांवर यशस्वीरित्या पार पडला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही