मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये तुकाराम मुंढेंची बदली


मुंबई – पुन्हा एकदा शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली असून मुंबईत नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली असून तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत बदली होण्याआधी एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.

दरम्यान कालच तुकाराम मुंढे यांनी माझा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत, पण नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मागील 14 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांना मी विनंती करतो की, त्यांनी देखील चाचणी करुन घ्यावी. नागपूरमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मी घरातूनच काम करत आहे. आपण नक्कीच जिंकू, असे तुकाराम मुंढे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.