आयपीएल खेळण्यासाठी दुबईत दाखल झालेल्या ‘दाजीं’साठी सईचा प्रेमळ सल्ला


भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईत करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आता सर्वच संघ सज्ज झाले आहेत. या स्पर्धेसाठी एक-एक करत सर्व संघ २० ऑगस्टनंतर युएईत दाखल झाले आहेत.

View this post on Instagram

Hello Dubai 😁🕘👀

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व करणारा विराट कोहली देखील दुबईत दाखल झाला आहे. विराटने दुबईत आल्यानंतर आपल्या हॉटेलच्या रुमवर एक फोटो काढत चाहत्यांना आपण दुबईत सुखरुप पोहचल्याचे सांगितले.

विराटच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी त्याला यंदा ट्रॉफी जिंकूनच ये, त्याचबरोबर शुभेच्छांचे संदेश दिले. परंतू मराठी सिने-सृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने, विराटच्या या पोस्टवर दाजी काळजी घ्या, सेफ रहा ! अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्यांनीही सईच्या या जरा हटके कमेंटला पसंती दर्शवली आहे.