महाड दुर्घटनेतून बचावलेल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची एकनाथ शिंदेंनी घेतली जबाबदारी


मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाड इमारत दुर्घटनेतून वाचलेल्या चार वर्षीय मोहम्मद नौसीन बांगी आणि ५ वर्षीय अहमद हशीम शेकनाग या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे सांगितले आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलणार असून त्यांच्या शिक्षणाची निवासी शाळेत व्यवस्था केली जाणार आहे. मोहम्मद आणि अहमद यांना मंगळवारी ढिगाऱ्याखालून काढण्यात आले.

या इमारतीच्या दुर्घटनेत मोहम्मदचे आई आणि दोन बहिणींचा मृत्यू झाला तर या दुर्घटनेत अहमदचे आई वडीलांचा देखील मृत्यू झाला आहे. महाडमधील काजळपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असे या इमारतीचं नाव आहे. या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच हाहाकार माजल्याचे पाहायला मिळाले. या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखालून जवळपास ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.