मनसेने तयार केले कोरोना काळातील राज्य सरकारच्या कामगिरीचे प्रगती पुस्तक


मुंबई : राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातील राज्य सरकारच्या कामगिरीबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वेक्षण घेतले होते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्य सरकारच्या कामगिरीचे प्रगती पुस्तक नागरिकांसमोर आणण्यात आले आहे.

मनसेने सात दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध मुद्द्यांवर नागरिकांची मते जाणून घेतली. या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर 54 हजार 177 नागरिकांनी आपली मते नोंदवली. याचा कौल आज जाहीर करण्यात आला आहे.

सर्वेक्षणात विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याला मिळालेला प्रतिसाद

लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का?

लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का?

लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी/उद्योगधंद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे का?

राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का?

शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत आहे का?

लोकल रेल्वेसेवा आणि एसटी सेवा पूर्ववत सुरु झाली पाहिजे का?

लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का?

लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत आणि योग्य मिळाली आहे का?

या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का?