कोरोनामुळे रोजगारात घट, स्थिती सामान्य होण्यास वेळ लागणार – आरबीआय रिपोर्ट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019-20 (जुलै-जून) चा वार्षिक रिपोर्ट जारी केला आहे. यात कोरोना व्हायरस महामारीमुळे गंभीर आर्थिक परिणाम झाल्याचे म्हटले आहे. यामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळीवर परिणाम झाला. गुंतवणूक कमी झाल्याने खर्च देखील कमी झाला. सुधारणांची आवश्यकता असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

आरबीआयच्या या रिपोर्टमध्ये गुंतवणूक वाढवणे आणि बदलांकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. आरबीआयने म्हटले की, दुसऱ्या तिमाहीत आर्थिक गतीविधींवर कोरोनाचा परिणाम दिसेल. उत्पादन आणि पुरवठा साखळी कोरोनामुळे विचलित झाली आहे. सरकारी आणि खाजगी खपामुळे रिकव्हरी होईल. आरबीआयने गुंतवणूकीसाठी सुधारणांची शिफारस केली आहे. या अहवालात आरबीआयने 2040 पर्यंत इंफ्रामध्ये 4.5 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

आरबीआयच्या रिपोर्टनुसार, 2019-20 मध्ये एकूण उत्पन्न 1.5 लाख कोटी आहे. मागील वर्षी एकूण उत्पन्न 1.95 लाख कोटी रुपये होते. 30 जूनपर्यंत आरबीआयकडे एकूण जमा 11.16 लाख कोटी रुपये होते.

आरबीआयने म्हटले की, या कालावधीमध्ये शहरा भागात खर्चात घट आल्याचे दिसून आले. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात मागणी चांगली होती. मागणी वाढणे आणि स्थिती सुधारण्यास वेळ लागेल. प्रवासी संकट आणि रोजगार कमी झाल्याने ग्रोथवर परिणाम झाला आहे.