अशा प्रकारे WhatsAppच्या माध्यमातून एकाच वेळी करु शकता 50 लोकांना व्हिडीओ कॉल


मुंबई : तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या आणि फेसबुक कंपनीचे इस्टंट मेसेजिंग फ्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या युझर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. याचदरम्यान फेसबुकने आपल्या युझर्ससाठी काही दिवसांपूर्वी Messenger Rooms फीचर आणले होते. 50 लोकांसोबत या खास फिचरच्या माध्यमातून ग्रुप व्हिडीओ करणे सहज शक्य झाले आहे. त्यानंतर हे फिचर कंपनीने आता इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप युजर्ससाठीही उपलब्ध करुन दिले आहे. पण याचा वापर कसा करायचा त्याची माहिती मोजक्याच युझर्संना आहे. पण आता सर्वांना ते वापरता यावे यासाठी माझा पेपर तुमची मदत करणार आहे.

कोरोनाच्या संकट काळात सध्या प्रत्येकजण वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच सध्या मोठ्या प्रमाणात अनेक नोकरदार, विद्यार्थी आणि शिक्षक अनेक वेगवेगळ्या अॅप्सचा आधार घेत आहे. अशातच फेसबुकने उपलब्ध करून दिलेले हे फिचर यासाठी फायदेशीर ठरू शकते. युजर्सकडे WhatsApp Messenger Room हे फिचर वापरण्यासाठी लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर फेसबुक मेसेंजरचेही अपडेटेड व्हर्जन असणे गरजेचे आहे.

50 लोकांसोबत व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी फॉलो करा खालील स्टेप्स :

  • सर्वात आधी WhatsApp ओपन करून कॉल करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा
  • त्यानंतर Create a room ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुम्ही आता जसे Continue in Messenger ऑप्शन वर क्लिक कराल, तेव्हा तुमच्यासमोर मेसेंजर अॅपची लिंक ओपन होईल.
  • आता Try it, when prompted वर क्लिक करा.
  • त्यायानंतर Create Room वर क्लिक करा आणि रुमला एक नाव द्या.
  • आता Send Link on WhatsApp वर क्लिक करा. यामुळे व्हॉट्सअॅप पुन्हा ओपन होईल.
  • आता या रूमची लिंक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुप्समध्ये शेअर करा.

WhatsApp वर Rooms जॉईन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • WhatsApp वर आलेल्या रूम लिंकवर क्लिक करा.
  • मेसेंजर अॅप किंवा वेबसाइटवर ही लिंक ओपन होईल.
  • आता रूम जॉईन केल्यावरच 50 लोकांना तुम्ही व्हिडीओ किंवा ऑडियो कॉल करू शकतात.